कांदा हा आपल्या दैंनंदिन जिवनात वापरला जाणारा प्रमुख अविभाज्यक पदार्थ आहे. कांदा हा तीन प्रकारचा असतो लाल कांदा, हिरवा कांदा, आणि पांढरा कांदा. कांद्यामुळेच आपल अन्नपदार्थ हे रुचकर आणी चविष्ट बनतात. कांद्याचा वापर हा आपल्या दैंनंदिन जेवणात करतोच पण त्याच कांद्याचे महत्व आपल्याला माहीत नसते. तेच महत्व आणी त्याचे फायदे व गुणधर्म या पोस्टच्या साहाय्याने दिलेले आहे.

कांद्याचे गुणधर्म :

कांद्याला ऐलिअम सेपा ( Allium cepa ) या वैज्ञानिक नावाने संबोधले जाते. इंगलिश मध्ये कांद्याला ओनियन या नावाने संबोधले जाते. कांद्यामध्ये अमीनो आम्ल सल्फॉक्साइड आणि सल्फेनिक आम्ल नावाचे केमिकल असतात. जे ऐकत्र मिळुन प्रोपैंनथियॉल एस-ऑस्काइड आम्ल बनते. याच प्रोपैंनथियॉल एस-ऑस्काइड आम्लामुळेच आपण कांदा कापत असताना आपल्या डोळ्यातुन पाणी येते. या मधे बेन्जोइक आम्ल, (Alginic Acid) ऑक्जैलिक आम्ल, (Oxalic Acid) ऐलिसिन आम्ल (Allicin Acid) अशा अनेक आम्लांचा सुधा समावेश असतो. कांद्यामध्ये अनेक प्रकारचे कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम पॉटेशियम, आणी विटामिन A, B, C सारख्या अनेक विटामीनचा सुधा समावेश असतो. याच कारणामुळे आपल्या दैंनदिन जीवनात कांद्याचा वापर हा मोठ्या प्रमाणे होत असतो.

कांदा आपल्या शरीरावर कसा उपयोगी पडतो ते पुढील प्रमाणे :-


कांद्याचेचे फायदे अथवा उपयोग हे जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे.    

 कांद्यामुळे आपले शरीर सुदृढ आणी निरोगी राहते. आपण जर कच्चा कांदा खाल्ला तर आपल्या शरीरातील ब्लड सरक्युलेशन हे सुरळीत चालते. त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा वाढुन योग्य त्या पेशी पर्यंत रक्त पुरवठा पोहचतो.

 कांदा हा आपल्या शरीरातील हाडे, मस्सल यांना मजबुत करण्यासाठी खुप फायदेमंद आहे.

 कच्चा कांद्याचे सेवन केल्याने पोटाची चरबी, अथवा पोटाचे विकार कमी करण्यास आणी पचन क्रिया सुरळीत करण्यास मदत होते.

 कांद्याचा फार मोठा फायदा हा आपल्या केसांना होतो. आपण कांद्याचे पाणी अथवा तेल काडुन डोक्याला लावले तर केसांची गळती कमी होऊन त्यांना मजबुती मिळते. केस दाट होतात. 

 आपल्या शरीरावर घाव, सापाचा दंक्ष, अथवा जखम झाली असेल तर कांद्याचा लेप लावल्याने रक्त प्रवाह बंद होवुन जखम लवकर भरते.

  कांद्याचे फायदे येवढेच नाही तर कांदा आपल्या चेहर-यावर सुध्दा उपयोगी पडतो कांद्याचा लेप जर आपण चेह-र्याला लावल्याने चेहर-याचे डाग सर्कल अथवा पिंपल्स लवकर कमी होतात.

 कच्चा कांद्याच्या सेवनाने ताण-तणाव सुधा कमी होवुन शरीर उत्साहित राहते.

 कच्चा कांदा मेंदुतील न्युरॉनचे प्रमाण वाढवतो जेणेकरुन आपल्या डोक्यात नवीन क्रियेटिव विचार निर्माण होतात. कांदा हा डोळेदुखी, निद्रानाश, कानदुखी, ( कानात कांद्याचा रस दोन तीन थेंब टाकणे ) सारख्या विकारांना दुर करण्यास मदत करते.

 कांद्याच्या सेवनाने डायबिटीसचे प्रमाण सुधा कमी होते.

 कांद्याचा फायदा हा कोणत्याही प्रकारचा नशा उतरवण्यासाठी फार उपयोगी होतो.

 प्रवासात उल्टीची समस्या होत असेल तर कांद्याच्या फोडीचा वास घेतल्याने अथवा त्याच्या पाकळीच्या सेवनाने उल्टीची समस्या सुधा दुर होते.

येवढेच नाहीतर अशा अनेक फायद्याने कांदा हा आपल्या दैंनंदीन जीवनात उपयोगी ठरतो.